संस्कार
जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्कारांशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजांप्रमाणे असते.
संस्कार म्हणजे नेमकं काय असत? संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात. तसेच संस्कृती पण संस्कारांवर निर्भर असते. दोन्ही एकमेकावर आधारित असतात. संस्कार म्हणजे मानवाच्या व मानव समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवात असले पाहिजे. अशा गुणांचा फक्त व्यक्तिगत लाभ नसतो तर सर्व समाज त्यापासून लाभान्वित होतो. निरोगी समाजजीनाकरिता उत्तम संस्कारित मानव आवश्यक आहे.
| |
आपली दिनचर्या नियमित ठेवणे, आहारनियमांचे पूर्ण पालन करणे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे. भक्ष्य अभक्ष्यांचा विचार करून खाणे. नेमही शुद्ध व सात्त्विक आहार घेणे या सर्व गोष्टी स्वस्थ मानवी जीवनाकरिता आवश्यक आहेत. हे सर्व शारीरिक, मानसिक दृष्टीने खूप जरूरी आहे. सामाजिक स्वास्थ्याकरिताही याची नितांत गरज आहे.
प्रकृती पण आपल्या नियमाने चालते. दिवस-रात्र, महीने ऋतू सर्वे काही नियमाने चालत आहे. जगातील सर्व व्यवहार एका नियमबद्ध चाकोरीत चालतात. पाऊस नियमाने पडतो. पिके पण आपल्या ठराविक वेळेवर येतात. हिवाळा आणि उन्हाळा पण निसर्गनियमांप्रमाणे येतात व जातात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थित रीतीने पार पडतात. हे सर्व जगाच्या कल्याणाकरिताच होच असते.
म्हणून मानवसमाजाने पण आपले जीवन सुखी होण्याकरिता चांगले संस्कार बाणवायला हवे. या सर्व गोष्टींची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. मुलांना लहानपणां पासूनच चांगल्या सवयी लावायला हव्या. एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घराघरातूनच व्हायला हवी. चांगल्या सवयीचं आणि चांगल्या संस्काराचं महत्त्व पटवून द्यायला हवं. त्याचे फायदे व तोटे ही समजून द्यायला हवे

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें