संस्कार
जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्कारांशिवाय जीवन भरकटलेल्या जहाजांप्रमाणे असते. संस्कार म्हणजे नेमकं काय असत? संस्कार संस्कृतीनेच उत्पन्न होतात. तसेच संस्कृती पण संस्कारांवर निर्भर असते. दोन्ही एकमेकावर आधारित असतात. संस्कार म्हणजे मानवाच्या व मानव समाजाच्या चांगल्या सवयी. असे सद्गुण हे मानवात असले पाहिजे. अशा गुणांचा फक्त व्यक्तिगत लाभ नसतो तर सर्व समाज त्यापासून लाभान्वित होतो. निरोगी समाजजीनाकरिता उत्तम संस्कारित मानव आवश्यक आहे. एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घराघरातूनच व्हायला हवी. चांगल्या सवयीचं आणि चांगल्या संस्काराचं महत्त्व पटवून द्यायला हवं. आपली दिनचर्या नियमित ठेवणे, आहारनियमांचे पूर्ण पालन करणे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे. भक्ष्य अभक्ष्यांचा विचार करून खाणे. नेमही शुद्ध व सात्त्विक आहार घेणे या सर्व गोष्टी स्वस्थ मानवी जीवनाकरिता आवश्यक आहेत. हे सर्व ...